दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा शहरापासून अगदी जवळच असलेल्या,नेहमीच चर्चेत असलेल्या पारडी येथे लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पारडी येथे करण्यात आले असल्याची माहिती आयोजक बालाजी पाटील डिकळे यांनी दिली.
गत विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी कौल दिलेले एकमेव गाव म्हणून पारडी ची गणना केली जाते. दरम्यान कोरोनाच्या जागतिक महामारीच्या कालावधी नंतर लोहा-कंधार चे कर्तव्य दक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी गावोगावी विकास कामांचा झपाटा सुरू केला परंतू अंतर्गत पारडी येथील स्थानिक व वरिष्ठ पातळीवरील दबावाच्या राजकारणामुळे आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांना हक्काचे लोक प्रतिनिधी असतांनाही वेळोवेळी डावलण्यात आले. आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पारडी येथील विठ्ठलेश्वर मंदिर समोरील मैदानावर सर्व सामान्य हक्काच्या मतदारांच्या उपस्थितीत भव्यदिव्य नागरी सत्कार व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात आमदार श्यामसुंदर शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा मन्याडच्या वाघीण बिरूदावली दिलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून बालाजी पाटील डिकळे यांचे शेकडो कार्यकर्ते भव्य नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती नोंदवून पक्ष प्रवेश सोहळ्याचे साक्षीदार ठरणार आहेत.पारडी जनमानसातील वाढती लोकप्रियता, शिंदे दाम्पत्यांनी मतदार संघातील लावलेला कामाचा धडाका, प्रशासनातील दांडग्या अनुभवाच्या जोरावर कोट्यवधी रुपयांचा निधी मतदार संघात खेचून आणून सर्व सामान्यांची सेवा करण्याचे जणू आमदार श्यामसुंदर शिंदे यांना लाभलं आहे. अशी प्रतिक्रिया आयोजक बालाजी पाटील डिकळे व समर्थकांनी दिली आहे.