
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/धारुर— “नूतन माध्यमिक विद्यालय” अंजनडोह “ता. धारूर जि. बीड “येथे दिनांक 22. 2. 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त “क्रीडा “व सांस्कृतिक “स्पर्धेचे बक्षीस वितरणाचा व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री. देशमुख सर व “प्रमुख पाहुणे म्हणून व कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण”अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध ,गायक ,संगीतकार “प्रा.शंकर सिनगारे”( संगीत अलंकार ,नेट) हे आवर्जून उपस्थित होते त्याचबरोबर संस्थेचे सचिव मा. श्री.आदमाने आप्पा हेही आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले”यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे श्री. प्राध्यापक शंकर सिनगारे व संस्थेचे सचिव मा. श्री आदमाने आप्पा यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विजयी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर प्रा. सिनगारे सरांनी विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून ध्येयासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे,असे आवाहन” आपल्या मार्गदर्शनातून केले.” तसेच या प्रसंगी प्रा.शंकर शिनगारे सरांनी आपल्या सुमधूर आवाजात गायन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी भावनीक मनोगत व्यक्त केले.तसेच संस्थेचे सचिव सुंदरराव अदमाने, मुख्याध्यापक देशमुख सर, वर्गशिक्षक टि.डी.सोळंके सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आपल्या पहाडी आवाजात श्री.आडे सरांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.सोळंके भरत सरांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.