
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
=========================
निलंगा(प्रतिनिधी)राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे या प्रमुख मागणी साठी 1 मार्च रोजी हजारोंच्या संख्येत आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले,त्यावेळी या आंदोलनाची दखल घेत ग्रामविकासमंत्री ना.गिरीशजी महाजन यांनी आझाद मैदानावर भेट दिली व प्रश्न जाणून घेऊन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत संघटनेच्या शिष्टमंडळासह बैठक लावली यावेळी आ.मंगेशदादा चव्हाण हेही बैठकीस उपस्थित होते,या बैठकीत यावलकर समितीने केलेल्या शिफारशीनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यावर चर्चा झाली,त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री ना.फडणवीस साहेब म्हणाले की,संगणकपरिचालकांचा प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे त्या बाबत शासन सकारात्मक असून अर्थ विभागात फाईलची प्रक्रिया पूर्ण करून पुढील निर्णय लवकरच देण्यात येईल,याच वेळी बोलताना ना.महाजन साहेब म्हणाले की,अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच सोडवून संगणकपरिचालकांना न्याय देण्यात येईल.
याबाबत सविस्तर वृत्त की,आपले सरकार व संग्राम प्रकल्पात मागील 11 वर्षापासून ग्रामीण भागातील सुमारे 7 कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देऊन,ग्रामपंचायतचा कारभार ऑनलाईन करणाऱ्या संगणकपरिचालकांना यावलकर समितीने शिफारस केल्यानुसार ग्रामपंचायत च्या सुधारित आकृतीबंधात कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीसाठी 27 फेब्रुवारी पासून बेमुदत संप सुरू आहे तसेच 1 मार्च 2023 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले,या आंदोलनाची दखल स्वतः ग्रामविकासमंत्री ना.गिरीशजी महाजन साहेबांनी घेतली व ते आंदोलन स्थळावर आले,त्यांच्या समोर संघटनेच्या वतीने सिद्धेश्वर मुंडे यांनी प्रश्न मांडला,चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण साहेबानी संगणकपरिचालक अनेक वर्षांपासून काम करत असून त्यांचा प्रश्न रास्त असून शासनाने हा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली,यावेळी बोलताना ग्रामविकासमंत्री मा.महाजन साहेब म्हणाले की,मागील 3 वर्षापासून ग्रामविकास विभागात धूळखात पडलेल्या फाईलला आता आम्ही गती दिली असून लवकरच शासन निर्णय घेऊन सर्वांना न्याय देण्यात येईल,असे आश्वासन दिले,त्यावर संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त केले व आता प्रश्न वित्त विभागाचा असून त्यावर मा.देवेंद्रजी फडणवीस साहेबा सोबत बैठक लावून निर्णय घेण्याची मागणी केली,त्यावर आ.मंगेशदादानी महाजन साहेबांना विनंती केली असता आंदोलन स्थळावरूनच मा.महाजन साहेबांनी लागलीच मा.देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कॉल केला व बैठक लाऊन निर्णय घेण्याची विनंती केली असता त्यांना होकार दिला व आंदोलन स्थळावरून महाजन साहेब संघटनेच्या शिष्टमंडळाला घेऊन गेले,विधानभवनात उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यात संघटनेच्या वतीने सिद्धेश्वर मुंडे यांनी आपली बाजू मांडत आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंधात कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी केली व सध्या ग्रामविकास विभागाने सदरची फाईल वित्त विभागाकडे पाठवली असून आपण त्यावर निर्णय घेण्याची मागणी केली,त्यावेळी त्यांना वित्त विभागात पाठलेल्या फाईल क्रमांकाची प्रिंट व यावलकर समितीने शिफारस केलेल्या अहवालाची प्रत देण्यात आली,यावेळी आमदार मंगेशदादांनी आपली बाजू मांडली व संगणकपरिचालकांचा प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे सांगितले यावर ग्रामविकासमंत्री महाजन साहेब म्हणाले यांचा अनेक वर्षांचा प्रश्न आहे,तो सोडवला पाहिजे त्यांना खूप कमी मानधन मिळते,त्यांची फाईल आपल्या विभागाकडे आम्ही पाठवली असून त्यावर आपण निर्णय घ्यावा,त्यावर फडणवीस साहेब म्हणाले की यांचा प्रश्न मला पूर्वीपासून माहीत आहे,याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहून निर्णय घेईल,सरकार यांच्या बाबतीत सकारात्मक आहे,वित्त विभागाकडे गेलेल्या फाईलची प्रिंट त्यांनी लागलीच त्यांच्या सचिव साहेबाकडे दिली व तात्काळ वित्त विभागातून त्यास मान्यता देण्याच्या सूचना केल्या व पुढील प्रक्रिया पूर्ण करून घेऊन निर्णय देण्याचे आश्वासन दिले,त्यावेळी महाजन साहेब म्हणाले मी स्वतः या फाईलचा संपूर्ण पाठपुरावा करून आपला निर्णय देतो आता वित्तमंत्री असलेले मा.फडणवीस साहेब म्हणत आहेत त्यामुळे लवकरच आपला निर्णय देण्यात येईल,त्यानंतर आझाद मैदान येथे आंदोलन स्थळावर राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांची तातडीची बैठक घेऊन सर्वांसमोर घेतली सर्वांच्या मतानुसार आता आपल्या निर्णयाला गती येणार असून वित्त विभागात आपली फाईल धूळखात पडणार नाही,शासन सकारात्मक आहे,आपण सध्या आंदोलन स्थगित केले पाहिजे,तेव्हा राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सर्व संगणकपरिचालकांसमोर आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले.