
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
देगलूर तालुक्यातील खानापूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विचाराची शिवजयंती साजरी करण्यात आली. मिरवणूक बँड डीजे या गोष्टीला फाटा देत शाहीर महाराष्ट्राचा हा शाहिरी संतोष साळुंखे यांचा शाहिरी जलसा कार्यक्रम घेण्यात आला.
शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष बजरंग रघुनाथराव कोरेवाड व सर्व टीमने अथक परिश्रम करून शाहिरीच्या या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मोठ्या उत्साहात करून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. सर्व टीमला मार्गदर्शक अच्युत पा कदम, शेषराव पा घरडे, अनील पा खानापूरकर,शिवकुमार ताडकोले,बालाजी तुरुकवाड, संतोष पा कदम,मोहन पाटील कदम , इत्यादी मंडळीचे वेळोवेळी सहकार्य लाभले.
भव्य दिव्य व मोठ्या शाहिरीच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व स्तरातून अध्यक्ष बजरंग कोरेवाड व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले जात आहे.