दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी केलेली वैद्यकीय मदत ही लाख मोलाची आमच्यासाठी आहे. तसेच या पाठपुरावासाठी पांडुरंग धस हे आम्हाला आमच्या मदतीला धावून आले. त्याबद्दल आम्ही साहेबांचे ऋणी आहोत :-जाधव कुटुंब
भुम:- बार्शी येथील जगदाळे मामा येथे उपचार घेत असलेले भूम तालुक्यातील आंबी येथील रूग्ण सुभाष नवनाथ जाधव यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एक लाख रुपयाचा खर्च अपेक्षित होता. मोल मजूरी करून उदारनिर्वाह चालवणे अवघड होते.त्यामुळे जाधव कुटुंबाला तो खर्च करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पांडुरंग धस यांच्याशी संपर्क साधून व सर्व परिस्थितीची हकीकत सांगितली. यानंतर पांडुरंग धस यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांची भेट घेऊन रुग्णाची हालाकीचे बिकट परिस्थिती व उपचारासाठी लागणारा खर्च सांगितला याची तात्काळ दखल घेत आरोग्य मंत्री यांनी विलंब न लावता धर्मदाय ट्रस्टच्या माध्यमातून जाधव कुटुंबांना एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य करत वरिष्ठ अधिकारी यांनी ही मदत करण्यास सांगितले.यावेळी पांडुरंग धस यांना मदतकार्य कामासाठी वैद्यकीय मदत अधिकारी डॉ. रवींद्र अनभूले ,वरिष्ठ जिल्हा समन्वयक महात्मा फुले जन आरोग्य योजना सोलापूर डॉ. रवी भोपाळे वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी केलेली वैद्यकीय मदत ही लाख मोलाची आमच्यासाठी आहे. त्याबद्दल आम्ही साहेबांचे ऋणी आहोत असे जाधव कुटुंबाने सांगितले.