
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार/संगुचीवाडी बायपास रस्ता लोकांसाठी खुला करण्यात आला असून भोपाळवाडी फाटा छत्रपती संभाजी महाराज चौक येथून वाहने जात होते. त्यामुळे धुळीने परीसरातील व्यावसायिक व नागरीकांना त्रास होत असल्याने त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन बायपास रस्ता चालु करण्याची मागणी केली होती. दै. चालु वार्ता पेपर मध्ये बातमी प्रसिद्ध केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बायपास रस्ता चालु करण्यात आला आहे. त्यामुळे भोपाळवाडी फाटा येथील व्यावसायिक व नागरिकांनी दै. चालु वार्ता चे मुख्य संपादक श्री. डि. एस. लोखंडे पाटील यांचे आभार मानले आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराज चौकातील कंधार रस्त्यावर रहदारीमुळे मोठ मोठे खड्डे पडले आहेत.या रस्ताचे काम मंजूर करण्यात आले असून गीट्टी टाकून गूत्तेदार गायब झाला आहे. काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. दुसऱ्या गूत्तेदारास काम देऊन रस्ता लवकर पुर्ण करण्याची मागणी व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे. रस्त्या दुरूस्त करून होणाऱ्या धुळीच्या त्रासापासून व शारीरिक आणि आर्थिक नुकसानीपासून सुटका करण्याची मागणी जनतेनी केली आहे.