
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- येथील सिध्दार्थ ऐज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध शालेय क्रिंडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष देवरावजी सोनसळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटराव पाटील घोरबांड ( मा.प.सं.सदस्य तथा प्रतिनिधी सभापती पंचायत समिती कंधार ) रूद्र संजय वारकड ( चेअरमन से.स.सो.उस्माननगर ) बाबूराव पाटील घोरबांड ( सदस्य सेवा सहकारी सोसायटी) मुख्याध्यापक राहुल सोनसळे ,गणेश लोखंडे ( सहकोषाध्यक्ष नांदेड जि.मराठी पत्रकार संघ तथा अध्यक्ष विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघ उस्माननगर) माणिक भिसे ( उस्माननगर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष) यांची उपस्थिती होती.यावेळी विद्येची देवता माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी शाळेच्या मुलीनी प्रमुख अतिथी यांचे सामूहिक स्वागत गित गाऊन स्वागत केले. त्यानंतर शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.सम्राट अशोक प्राथमिक शाळेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवाह बरोबर कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध शालेय क्रिंडा स्पर्धैचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये क्रिकेट , कबड्डी, खो-खो,लांब व उंच उडी ,धावणे , निबंध स्पर्धा , विविध स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत सुयश मिळालेल्या विद्यार्थ्यी विद्यार्थीनीचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक राहुल सोनसळे, गणेश लोखंडे ,देवरावजी सोनसळे यांनी मार्मिक भाष्य करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी शाळेतील सहशिक्षक मन्मथ केसे , देविदास डांगे, भगवान राक्षसमारे, नितिन लाटकर, शकील शेख, समता जोंधळे, मणिषा भालेराव, सोनकांबळे ,यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोहम सोनटक्के व गवळी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी केले.