
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी -विजयकुमार चिंतावार
भोकर पासून मुदखेड पर्यंत महामार्गाचे काम अपूर्णच राहिल्याने पांडुरणा घाट पासून रिठा या गावापर्यंत मोठ मोठे खड्डे पडले असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे या खड्डयामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
भोकर पासून मुदखेड पर्यंत २२ कि.मी. चा असलेला हा महामार्ग माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोकराव चव्हाण यांच्याच मतदारसंघातील दोन तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या महामार्गासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून अंदाजे ११० कोटी रुपये या महामार्गासाठी मंजूर करण्यात आले निधी मंजूर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हे काम शारदा कंस्ट्रक्शन कंपनीने अतिशय वेगाने सुरू केले परंतू या २२ कि मी च्या अंतरामध्ये जवळपास तीन ते चार किमी रस्ता हा वन विभागाच्या हद्दी मध्ये असुन वनविभागाची मान्यता अद्यापही या कामासाठी मिळालेली नसल्याने हे काम रखडलेले आहे. समृद्धी सारखे महामार्ग हे मोठ मोठे माळ रान कोरून तयार करण्यात आले तिथे त्याच खात्याची परवानगी मिळते पण विकास कामाकरीता व जनतेच्या हिताकरीता वन विभागाने अद्याप पर्यंत मान्यता न देणे हे वन विभागाचे चुकीचे धोरण आहे असे प्रवासी बोलत आहेत.काम रखडलेल्या ठिकाणी रस्त्याची अतिशय दयणीय अवस्था झालेली असून खूप धूळ उडत आहे धुळीमुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे तसेच त्यामुळे या रोडवरती रोजच किरकोळ अपघात होताना दिसत आहेत.असे असताना देखील या रस्त्याकडे संबंधित विभागाचे अधिकारी आणि गुत्तेदार या दोघांचेही लक्ष दिसून येत नाही एखादा मोठा अपघात घडून जिवीत हानी होईल तेव्हाच जाग येईल काय असेही नागरीक बोलत आहेत.किमान लोकप्रतिनिधी तरी याकडे लक्ष घालतील का? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे.