
दै. चालू वार्ता प्रतिनिधी नांदेड बाजीराव गायकवाड
मुंबई:- टास्क फोर्सने इयत्ता पहिली पासूनच्या शाळा सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे टास्क फोर्सने सांगितले आहे. क्रिकेट, धावण्याच्या स्पर्धा अशा खेळांना सुद्धा मान्यता देण्यात आली आहे परंतु खोखो कबड्डी सारखे खेळ घेता येणार नाहीत.मतिमंद, गतिमंद मुलांच्या शाळा सुद्धा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.वसतिगृह सुरू करण्यासाठी मात्र विद्यार्थ्यांची RTPCR टेस्ट करणने आवश्यक आहे. तसेच बाहेरगावी जाऊन आल्यानंतरही RTPCR टेस्ट करावी लागणार आहे. अशा प्रकारचे निर्णय टास्क फोर्सने नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे.त्यामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आता सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. यातील काही मुलांनी शाळा सुद्धा पाहिली नाही. यावर्षी पहिली, दुसरीचे विद्यार्थी एकदाही शाळेत आले नाहीत. एवढ्या मोठ्या गॅप नंतर विद्यार्थी शाळेत येणार आहेत तेव्हा विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण शैक्षणिक क्षय भरून काढणे हे मोठे आव्हान शिक्षण क्षेत्रापुढे आहे.