दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी परतुर/…
मा.एकनाथ संभाजीराव शिंदे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी परतुर यांच्या मार्फत दिनांक,३/३/२०२३ रोजी निवेदन निवेदन देऊन श्री सोळंके पुढे म्हणाले कि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री संदीप देशपांडे यांच्यावर दादर शिवाजी पार्क मुंबई येथे आज पाहाटे मॉर्निंग वॉक करत असताना जीव मारण्याचा प्रयत्न केला म्हणून या हल्लेखोरांनावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या व मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी करण राजकीय माफिया गुंड प्रवृत्ती वकृती आहे,हा हल्ला राजकीय आहे का? कारण श्री.संदिप देशपांडे हे नेहमी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार अन्याय विरोधात आवाज उठून सामान्य माणसाला न्याय मिळाला म्हणून काम करत असतात,श्री देशपांडे यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे,या मारेकऱ्यांन सोधुन राष्ट्रीय सुरक्षा कायद्या/मोका अंतर्गत खटला दाखल करण्यात यावा,कारण या पुर्वी अनेक जनांची मॉर्निंग वॉक करतांनी महाराष्ट्र राज्यात हत्या झालेल्या आहेत,हा खूप गंभीर विषय आहे,या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत त्यांचा सोध घेऊन कठोर कारवाई करावी हि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा आहे.मनसे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांचे सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री संदीप देशपांडे यांच्यावर दादर शिवाजी पार्क मुंबई येथे मॉर्निंग वॉक करतांनी जीव मारण्याचा प्रयत्न केला या हल्लेखोरांनावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या व मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्या यावी,९ मार्च पर्यंत योग्य ती कारवाई न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला सोबत राम नवल उपजिल्हाध्यक्ष जालना,कृष्णा गोवर्धन सोळंके,गणेश ज्ञानेश्वर बोराडे तालुका अध्यक्ष मंठा, सोपान गोरे शहराध्यक्ष परतुर,भातर शेळके उप तालुकाध्यक्ष, बाळासाहेब देशमुख उप तालुकाध्यक्ष, अर्जुन मोहिते, जगन सुरूंग, महादेव चव्हाण, महादेव मिसाळ, उत्तम जाधव, भारत बोरकर,राम बप्पा सोळंके,या सोबतच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.