दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -सिद्धार्थ तायडे
बुलढाणा :
खामगाव तालुक्यातील शिराळा येथे आज दिनांक 1 /3/ 2023 रोजी वंचित बहुजन महिला आघाडी ग्राम शाखा फलकाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग, जिल्हा उपाध्यक्ष सुमनबाई थाटे, तालुकाअध्यक्ष संगीता गवारगुरु, इंदुबाई वानखेडे ,सुजाताताई श्यामदे ,शिलाबाई शामदे नेहा तायडे प्रमिला तायडे, उषा तायडे, बेबी तायडे ,संगीता तायडे, मंदा वाकुळे, वच्छला मोरे ,वंदना तायडे, कांता तायडे, मंदा साळवे ,गीता तायडे ,सुंदर तायडे, भारती मोरे, इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या . येणाऱ्या जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी जोमाला कामाला लागावे व वंचित बहुजन आघाडी या पक्षाची सत्ता काबीज करावी असे आवाहनही बुलढाणा जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष विशाखा ताई यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना केले . या शाखा उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ललिता मोरे ,कोमल तायडे ,अंजली तायडे ,अंजना तायडे, सोनाबाई मोरे ,कुसुम तायडे, जिजाबाई तायडे, शीला इंगळे ,सुनीता कस्तुरे या महिला कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले,तसेच गावातील सर्व महिला व पुरुष व युवा आघाडी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.