
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
रत्नागिरी : कोकणातील हापूसला जगाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र, यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे.
मागील 20 वर्षांच्या तुलनेत यंदा आंब्याच उत्पादन कमी झालं आहे. बदलतं वातावरण आणि पिकावर पडणारा रोगाचा प्रादुर्भाव याचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी संकटात आहेत.
सध्या वातावरणात सातत्याने चढ उतार होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका आहे तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मात्र, मोठा फटका बसत आहे. त्यामुळ शेतकरी चिंतेत आहेत. वाढत्या उष्णतेचा मोठा फटका हापूस आंब्याला बसत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं राहिलं आहे. तसेच आंब्यावर थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव देखील देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोठ्या प्रमाणात औषध फवारण्या करुन देखील थ्रिप्सचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.