
दैनिक चालु वार्ता सिल्लोड: प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड : सिल्लोड – भराडी रस्त्यावर वांगी वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात पिकअप चालक जागीच ठार झाला तर बसमधील २७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान झाला. बसचा चालक गंभीर जखमी आहे. तर २० प्रवाशांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
सुरेश सांडू गुंजाळ ( ४२ वर्ष रा. पिंपळगाव पेठ) असे मृत पिकअप चालकाचे नाव आहे. धडक ऐवढी जोरदार होती की बसमध्ये अडकलेले पिकअप वाहन जेसीबीच्या मदतीने वेगळे करण्यात आले. बसचा चालक मधुकर राजधर आमटे ( रा. देऊळगाव बाजार ) गंभीर जखमी असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथेउपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सिल्लोड हुन पाचोरा ( बस क्रमांक एम एच १४ बी टी ४००६) कडे जात होती तर गॅस वाटप करून पिकअप भराडीहून रिकामे सिलेंडर घेऊन सिल्लोड कडे येत होता. दोन्ही चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहने समोरासमोर धडकली. रिकामे सिलेंडर रस्त्यावर पसरून वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर, नंदकिशोर सहारे, राजू गौर, राजेंद्र ठोंबरे, महंमद हनिफ, सुनील मिरकर, प्रवीण मिरकर, इरफान पठाण, शेख बबलू यांनी जखमींना मदत केली. पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे यांनी कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मागतीने जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.