दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : – लोहा – कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय नेते तथा महाराष्ट्राचे भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लोहा – कंधार मतदारसंघातील अनुसया काशीराम चोंढे या महिलेला आपघात रोगांवर होणारा खर्च भागविण्यासाठी रूग्णालयातील खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५०००० हजार रुपायांचा निधी उपलब्ध करून दिली आहे .
मितभाषी , वदनी सदा स्मीतहस्य असलेले लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते व सतत रुग्ण सेवेत धडपडणारे आरोग्यदुत एकनाथ दादा पवार यांच्या तोंडून रुग्ण सेवा हिच ईश्वर हे उद्गार ऐकावयास मिळतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन मदत मिळवुन दिल्याबद्दल अनुसया काशीराम चोंढे यांना यावेळी आरोग्यदुत एकनाथ दादा पवार यांचे आभार मानले
भारतीय जनता पार्टी सतत जनसामान्यांच्या सेवेसाठी कार्य करते व गरजुंना आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मिळाला आहे यापुढे लोहा कंधार मतदारसंघातील गरजुंना हाॅस्पीटलच्या संदर्भात गरज पडल्यास छञपती शिवाजी महाराज चौक लोहा येथील संपर्क कार्यालयास संपर्क साधावा असे आव्हान लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय नेते एकनाथ दादा पवार यांनी केले आहे. यावेळी सुर्योदय मन्याड फाॅउंडेशनचे तालुका प्रमुख गजानन पाटील मोरे , शहरप्रमुख खंडु पाटील पवार राम पाटील मुरंबीकर राहुल भैय्या चंदेल आदि पदाधिकारी उपस्थित होते.