दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर:राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या APL (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट असलेल्या शिधापत्रिका धारकांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी कुटूंब प्रमुख महिला यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये प्रति व्यक्ती 150/- रु थेट रक्कम हस्तांतरण योजना ( Direct Benefit Transfer – DBT) दिनांक 28 फेब्रुवारी 2023 च्या शासननिर्णयाद्वारे कार्यान्वित केलेली आहे. तेंव्हा देगलूर तालुक्यातील RCMS (Ration Card Management System ) मध्ये online असलेल्या सर्व शेतकरी शिधापत्रिका धारकांना या द्वारे आवाहन करण्यात येते की, अन्नधान्याऐवजी थेट रक्कम जमा करण्यासाठी अर्जाचा नमुना आपले गावाचे संबंधित तलाठी, व रास्त भाव दुकानदार यांचेकडे उपलब्ध आहे. सदर अर्जामध्ये शिधापत्रिकेमधील कुटुंब प्रमुख महिलांचे आधार संलग्न असलेल्या बँकेचा तपशील व online शिधापत्रिकेचा 12 अंकी नंबर 7/12 सह तलाठी किंवा रास्त भाव दुकानदार यांचेकडे जमा करावा..
शेतकरी शिधापत्रिकाधारकांनी सदर थेट रक्कम (DBT) योजनेचा लाभ घ्यावा असे अवाहन मा.श्री अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड, मा. श्री. संदिप कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली तहसिलदार राजाभाऊ कदम व निरीक्षण अधिकारी (पुरवठा) तथा नायब तहसिलदार श्री. बालाजी मिट्टेवाड यांनी केले आहे.