
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
अमोल भास्कर व त्याचे साथीदार महादेव शामराव भास्कर ,अमित उर्फ पिंटू महादेव भास्कर ,शंकर शामराव भास्कर संकेत सुरेश व्हटकर, यांनी कोल्हापूर मध्ये चांगलीच दहशत माजवली होती अवैध सावकारी, खून ,दरोडे, जबरी चोरी, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याने यावेळी ज्येष्ठ नागरिका ची राजारामपुरीतील जागा बळकावली आहे व खंडणी मागितली आहे त्यासंदर्भात त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे आम्ही त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे तसेच त्या भास्कर गॅंग ला कोण बळी पडला असेल त्यांनी तक्रार दाखल करावी असे पोलीस अधीक्षक यांनी आव्हान केले आहे अशाप्रकारच्या जर घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडत असतील तर नागरिकांनी कुणालाही न भिता पोलिसांशी संपर्क साधावा, नागरिकांनी, लोकांची ,व्यापाराची, विद्यार्थ्यांची, खंडणी स्वरूपात घटना समोर येत होत्या आतापर्यंत या टोळीने दोन गुन्ह्यात लोकांची फसवणूक झाल्याची माहिती निष्पन्न झाले आहे वयात गॅंग वर 48 गुन्हे आहेत
तसेचआपले प्रोफाइल फोटो फेसबुक व्हाट्सअप वापरताना काळजीपूर्वक वापरा आपले फोटो घेऊन आपली फसवणूक होऊ शकते आपल्या कडे खंडणी मागू शकतात अशा प्रकारे कॉल येऊ शकतात कोणाला जर असे आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवा चोवीस तासाच्या आत कारवाई होईल तसेच सायबर क्राईम चांगल्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये काम करत आहे हा जो खंडणी धारक आहे तो एकदा खंडणी घेऊन गप बसत नाही तो वारंवार खंडणी मागत राहणार त्यामुळे लवकरात लवकर पोलिसांना माहिती द्यावी तसेच तक्रार देणाऱ्याचे नाव गोपनीय राहील आणि त्यांच्यावर कारवाई शंभर टक्के होईल असे कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली