दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
————————————————–
अहमदपूर/लातूर:- अहमदपूर तालुक्यातील मौ.गंगाहिप्परगा येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक(मुख्याध्यापक) मा.दयानंद शिवराज मठपत्ती सर यांना दि.05/03/23 रोजी त्यांना लातूर येथील कै.दगडोजीराव देशमुख सभागृह, मार्केट यार्ड, लातूर येथे महात्मा ज्योतीराव फुले जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे तरी महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र पुरस्कार निवड समितीने आपण केलेल्या शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन आपली महात्मा ज्योतीराव फुले जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे तरी आपण राष्ट्र निर्मीतीच्या कार्यात व भविष्यातही आपले मोलाचे योगदान लाभले आहे म्हणून आपल्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे म्हणून मी पुरस्कार निवड समिती लातूर यांचा मनःपूर्वक आभारी आहे