दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे .
भोसरीतील डायनोमर्क कंट्रोल्स कंपनीत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले होते . 4 मार्च 1966 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने भारतात सुरक्षा दिन साजरा करण्यास सुरुवात केली.यावर्षी आपण 52 वा सुरक्षा सप्ताह साजरा करत आहोत. याचा मूळ उद्देश कामगारांना अधिकार व कर्तव्याची जाणीव व्हावी हाच खरा आहे. यासाठी रसायन , विद्युत , अग्नीवर नियंत्रण याची प्रात्यक्षिके करून दाखवली .
सुरक्षितपणे करूया काम, अपघातास देऊ पूर्णविराम. सुरक्षा नियम पाळा, अपघात टाळा
वाट बघतोय यमराज तिथे , नाही पाळत सुरक्षा नियम जिथे. सुरक्षित ठेवा नियंत्रण, नका देऊ दुर्घटनेला आमंत्रण. असे स्लोगन कंपनीच्या प्रवेशद्वारावर व इतर विभागातही लावले होते .
यावेळी व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत म्हणाले की कोणतेही काम करण्यापूर्वी समजून घेतल्याशिवाय काम करू नका विद्युत उपकरणे हाताळताना वरिष्ठाकडून कामाची माहिती करून घ्या ,नंतर च कामास सुरुवात करा.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अभ्यंकर यांनी सांगितले की उत्पादन वाढीबरोबरच तुमच्या सुरक्षिततेची आम्हाला काळजी आहे, सुरक्षा सप्ताह आठवडा साजरा न करता वर्षभर सुरक्षा सप्ताह आहे असे समजून काम करत राहा.
यावेळी गुणवंत कामगार अण्णा जोगदंड म्हणाले की “आमच्या स्थापनेत आम्हाला वारंवार सुरक्षिततेचे प्रशिक्षण दिले जाते काम समजल्याशिवाय काम न करण्याचा वरिष्ठांचा नेहमी सल्ला असतो ” असे ते म्हणाले.
गुणवंत कामगार आण्णा जोगदंड यांनी सर्व कामगारांना सुरक्षतेतची शपथ दिली.
यावेळी कामासंबधी सुरक्षितते वर चांगल्या सुचना(स्लोगन) करणाऱ्या कामगारांना रोख स्वरूपात बक्षीस देणार असल्याचे मानव संसाधन प्रमुख सूर्यकांत मुळे यांनी जाहीर केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अभ्यंकर व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत, मनुष्यबळ प्रमुख सूर्यकांत मुळे, अण्णा जोगदंड, विभाग प्रमुख हेमंत नेमाडे, अक्षरा राऊत , ,राजेश वैद्य, केतकी राऊत , पुनम फाळके, अक्षरा राऊत, शर्मिला कुरूंदकर इत्यादी विभाग प्रमुख उपस्थित होते