दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
मुखेड दि. २ (प्रतिनिधी ) मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत सर्वांग सुंदर अक्षर म्हणून कु. प्रणीता विजय पोतदार तर गुरुवर्य गौतमजी बोडके शिक्षक सन्मानासाठी सुप्रसिद्ध बासरीवादक शिक्षक ऐनोद्दीन वारसी यांची निवड करण्यात आली आहे.
मुखेड येथील जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूल मध्ये मायबोली मराठी परिषदेच्या वतीने २५ फेब्रुवारी (शनिवार ) रोजी गुरुवर्य तुळशीराम लक्ष्मण आंबुलगेकर यांच्या स्मणार्थ ‘सुंदर हस्ताक्षर ‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यास मुखेड तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येनी सहभागी झाले होते .त्यापैकी मुलांपेक्षाही मुलींची संख्या अधिक होती.
या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून त्यामध्ये मुलींनीच बाजी मारली असून जिल्हा परिषद (मुलींचे ) हायस्कूल मुखेड येथील इयत्ता आठवीतील मुलगी कु. प्रणीता विजय पोतदार ही प्रथम आली आहे.
या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत मुखेड तालुक्यातील विविध शाळेतील जवळपास १७५ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धाप्रमुख ज्ञानोबा जोगदंड , मायबोली मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आंबुलगेकर , विद्यमान अध्यक्ष प्रकाश पवार सर या त्रिस्तरीय सदस्यांनी या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर केलाअसून त्यानुसार सर्वांग सुंदर अक्षर म्हणून कु. प्रणीता विजय पोतदार (जिल्हा परिषद (मुलींचे ) हायस्कूल मुखेड ) येथील विद्यार्थीनीची प्रथम क्रमांने निवड करण्यात आली आहे.
हा सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा ‘ अक्षर तुळशी सन्मान ‘ शाल ,श्रीफळ ,सन्मानचिन्ह व दोन हजार रुपये असे या सन्मानांच स्वरूप आहे .
प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून अन्य सात विद्यार्थ्यांना ‘ प्रोत्साहन प्रमाणपत्र ‘ देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच मायबोली मराठी परिषदेचे सक्रीय सदस्य स्व. गौतम बोडके यांच्या स्मणार्थ दिला जाणारा २०२३ सालचा ‘गुरुवर्य गौतमजी बोडके शिक्षक सन्मान ‘ देगलूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होट्टल येथील सुप्रसिद्ध बासरीवादक शिक्षक श्री. ऐनोद्दीन वारसी यांना जाहीर झाला आहे. १९ मार्च रोजी होणाऱ्या एकदिवशीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थित या दोघांचा ही यथोचित सन्मान करून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मायबोली मराठी परिषदेच्या वतीने त्यांचे मनस्वी खुप खुप अभिनंदन !