दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
———————————————-
लातूर/अहमदपूर:-अहमदपूर तालुक्यातील
जनतेची सोय व्हावी या साठी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून काम करणार्या महावितरणच्या सर्व लाईनमन बांधवांचा लाईनमन कृतज्ञता दिवसाच्या निमित्ताने सम्राट मित्रमंडळ-लातूर अहमदपूर च्या वतीने पुष्पहार देवून सत्कार करून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी मी माझे मनोगत व्यक्त करून कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी बद्दल आम्ही आणी आमचे नेते कायम आपल्या सोबत असल्याचे अभिवचन दिले.
या वेळी लाईनमन जी.डी.गूळवे,खंदारे, सी.एम.भारती,योगेश इंगोले, सचिन मंगरूळे,गणेश पांचाळ,वैभव गर्जे, मटकवार,अनिल पाटील आदी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी होते तर प्रमुख पाहूणे म्हणून वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ मूंडे,पत्रकार अजय भालेराव,दैनिक चालु वार्ता पत्रकार अहमदपूर तालुका प्रतिनिधी राठोड रमेश ग्रामपंचायत सदस्य राहूल गायकवाड,सचिन बानाटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तबरेजभाई सय्यद यांनी केले तर आभार आकाश पवार यांनी मानले