
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार : कळका :-कंधार तालुक्यातील कळका येथे हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प.शिवाजी महाराज बोकारे आळंदीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार व कळका नगरीचे भूमिपुत्र श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (कळकेकर) यांच्या वतीने गावकऱ्यांना व परिसरातील भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.काल्याच्या किर्तनाला उपस्थिती व महाप्रसादाचे नियोजन कळका नगरीचे भुमिपुत्र श्री.प्रविण पाटील चिखलीकर (कळकेकर) यांनी केले होते.यावेळी कळका नगरीच्या प्रथम नागरिक सौ.सुनंदाताई हरीश गादेकर, बोरी बु चे सरपंच श्री.बालाजी झूंबाड , माजी सरपंच श्री.गोविंदभाई गायकवाड, सुग्रीव गायकवाड,शावजी गायकवाड, भाजपा चिटणीस कंधार व्यंकटराव लक्ष्मणराव कळकेकर, संभाजी दशरथ गायकवाड, ह.भ.प.रोहीदास महाराज कळकेकर, मुरलीधर रामराव गायकवाड, रामचंद्र गायकवाड, गणेश गायकवाड, अविनाश हनमंत कळकेकर, लिंबाजी गायकवाड,जनक गायकवाड, सुधीर गायकवाड,पुय्यड सर, यांची उपस्थिती होती.सप्ताहामध्ये सर्व भाविक भक्तांनी भजन ,प्रवचन , किर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला.