दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :-अंजनगाव सुर्जी येथे हिंदू खाटिक समाजाच्या वतीने सत्यशोधक समाजाचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी हिंदू खाटिक समाज भुषण डॉ.संतुजी लाड यांच्या १८२ व्या जयंती निमित्त अंजनगाव सुर्जी शहरातील सतीमाता मंदिर जवळील हॉलमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाप्रसंगी गजानन लवटे अध्यक्ष हिंदू खाटिक समाज अंजनगाव सुर्जी यांनी डॉ.संतुजी लाड यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण केले.तसेच डॉ.संतुजी लाड यांच्या जीवनाविषयी व केलेल्या महान समाज कार्याविषयी माहिती सांगितली.यावेळी उपस्थित हिंदू खाटिक समाज बांधव अंबादास मंडवे,श्रीकृष्ण लवटे,गजानन मंडवे,प्रकाश लवटे,अरूण मंडवे,देवानंद पारडे,गजानन कराळे,विनोद दुर्गे (शिक्षक),मनोज मंडवे,बंटी लवटे,पप्पू मंडवे सर्व समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन मंडवे यांनी केले आणि कार्यक्रमाचा समारोप केला.