दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण अध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या उपस्थितीत बुथ सशक्तिकरण अभियानांतर्गत चंद्रपूर विधानसभेतील चंद्रपूर ग्रामीण मंडळाची बैठक घुग्घुस येथील प्रयास सभागृहात आज आयोजित करण्यात आली.
या बैठकीला उपस्थित राहून विविध संगठनात्मक विषयांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व इतर निवडणुका तसेच करावयाच्या अभियानांच्या संदर्भात कार्यकर्त्यांना विस्तृत मार्गदर्शन केलं. चंद्रपूर ग्रामीण मंडळातील बुथ सशक्तिकरण अभियान यशस्वीपणे पुर्ण करण्यासाठी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्ष घालून काम करत अभियान यशस्वी करावे असे आवाहन ही यावेळी केले.
या बैठकीला जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, तालुका महामंत्री विजय आगरे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, रमेश बुच्चे, सौ. शोभाताई पिदुरकर, संजय तिवारी, विनोद चौधरी, सौ. नितूताई चौधरी आदींसह मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी, आजी/माजी लोकप्रतिनिधी, शक्ति व बूथ केंद्र प्रमुख आवर्जून उपस्थित होते.