दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआय कोठडी दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे.
मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाने देशभरातील विविध राज्यांमध्ये जोरदार निदर्शने करत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही भाजपवर निशाणा साधला. यातच मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारण्यात आला.
मनीष सिसोदिया यांच्या अटकेबाबत आम आदमी पक्ष भाजप सरकारला अनेक प्रश्न विचारत आहे. विरोधी पक्षात राहिल्याने भाजप केजरीवाल सरकारला त्रास देत असल्याचे आपचे म्हणणे आहे. या सर्व विषयांवर जेपी नड्डा एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सविस्तर उत्तरे दिली. मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का, असा प्रश्न विचारण्यात आला.