
दैनिक चालू वार्ता
(कंधार लोहा _विशेष प्रतिनिधी )ओंकार लव्हेकर.
कंधार तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध असणारे आदरणीय भानुदास पुंडलिकराव मद्रेवार गुरुजी माजी मुख्याध्यापक मनोविकास विद्यालय कंधार यांचे 02 डिसेंबर 2021 रोजी अमृत महोत्सवाचे कार्यक्रम ठरविला आहे. सदरील कार्यक्रमास श्री संत गुरुवर्य ज्ञानोबा माऊली (मठ संस्थान कुरळा) यांच्या शुभहस्ते कंधार परिसरातील 21 भजनी मंडळींना एक विना ज्ञानेश्वरी ग्रंथ
देऊन यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
सदरील कार्यक्रम 02 /12 /2019 रोजी गुरुवारी सकाळी 10 वाजता श्री. केदारेश्वर मंदिर वैभव नगर स्वप्नभूमी रोड कंधार येथे काल्याच्या कीर्तनानंतर काल्याच्या महाप्रसादाचा सर्व भाविकांना लाभ होणार आहे. सदरील कार्यक्रम वेळ सकाळी 10 ते 12 कीर्तनाची सांगता व 12 ते 4 जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
सदरील भानुदास मद्रेवार हे अतिशय ध्येयनिष्ठ कर्तव्यनिष्ठ व शाळेशी एकनिष्ठ असे माजी मुख्याध्यापक आहेत. खूप कष्टातून त्यांनी सामाजिक कार्यासाठी आपल्या मुलांना तयार केले आहे. भानुदास मद्रेवार हे माजी कडक व शिस्तप्रिय मुख्याध्यापक आहेत. तसेच समाजामध्ये त्यांची मुले डॉक्टर बालाजी मद्रेवार, डॉक्टर विवेकानंद मद्रेवार, व विद्याभूषण मद्रेवार एक प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनीही या वडिलांच्या अमृत महोत्सव वर्षाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे वडिलांचे 75 वर्ष तेही अमृत महोत्सव व डॉक्टर बालाजी मद्रेवार यांचे 50 वर्ष पूर्ण होत असून डॉक्टर बालाजी मद्रेवार यांची पत्नी सौ सारिका बालाजी मद्रेवार यांचा दोन डिसेंबर 2021रोजी वाढदिवस आहे .आणि याच दिवशी सर्वात महत्त्वाचे म्हणजे भागवताची समाप्ती व अमृत महोत्सव हा दुर्मिळ योगायोग घडून येत आहे.