दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकन रिचर्स फर्म कंपनी हिंडेनबर्गने गेल्या काही आठवड्यांपुर्वीच संशोधन अहवाल प्रकाशित केला होता.
या अहवालानंतर गौतम अदानीच्या शेअर्स आणि कमाईत मोठी घसरण झाली होती. त्याचसोबत जगातील सर्वांत श्रीमंताच्या यादीतल स्थान देखील त्यांनी गमावलं होते. त्यामुळे गौतम अदानी यांना मोठा धक्का बसला होता. या घटनेतून सावरत आता गौतम अदानी पुन्हा एकदा उभे राहत आहेत. अदानींच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी आली आहे. अदानींना सावरवण्यात एका व्यक्तींने मोलाची भूमिका बजावली आहे.हा व्यक्ती नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
हिंडेनबर्गच्या झटक्यानंतर हळूहळू गौतम अदानीचे शेअर्स सावरत आहेत. गेल्या चार दिवसांपासून अदानींच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. शुक्रवारी 4 मार्चला दुपारी अदानी समुहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईसेसच्या शेअर्स 18 टक्क्याने तेजाळले आणि कंपनीचे शेअर्स 1892 रूपयावर पोहोचले. यासोबतच अदानी एंटरप्राईजेसचा स्टॉकने 1017.10 रूपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून जवळपास 80 टक्के रिकव्हरी दर्शवली.
अदानी कंपनीचे दुसरे शेअर्स अदानी पावर, अदानी ट्रांसमिशन,अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मर आणि एनडीटीव्हीचे शेअर 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटमध्ये आहेत. अदानी पोर्टस, अंबूजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेडच्या शेअरमध्येही तेजी आली. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलाय की, अदानी समुहाच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण काय?