दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- धाराशिव शहरात यशवंतराव चव्हाण सभागृह छत्रपती संभाजी नगर रोड ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.गुप्ता सर व भूम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भागवत ढवळशंक यांच्या हस्ते जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत विशेष कर वसुली मोहीम मध्ये एक लक्ष रुपयापेक्षा अधिक ग्रामपंचायत कराची वसुली करून ग्रामपंचायत विकास कामासाठी निधी उपलब्ध करून मोलाचे योगदान दिल्याबद्दल गावच्या सरपंच सौ.विजया शिवाजी तिकटे व ग्रामविकास अधिकारी भागवत राठोड यांचा सन्मान प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.भूम तालुक्यातील पाथरूड ही मोठी ग्रामपंचायत ओळखली जाते गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गावचे सरपंच व सर्व सदस्य गण प्रयत्न करत आहेत. या मध्येच सन 2022 व 2023 या दरम्यान गावामध्ये जनजागृती करून एक लाखापेक्षा अधिक कर वसुली करून गावच्या विकासासाठी हातभार लावल्याबद्दल हा पुरस्कार मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या सन्मानाबद्दल युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे, गावचे उपसरपंच प्रा.तानाजी बोराडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बोराडे,विजय बोराडे,शिवाजीराव तिकटे,भाजपाचे महादेव वडेकर,समाधान बोराडे, मा.कृषी सभापती बलभीम भसाड,ग्रामस्थ आदींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.