दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:- उपजिल्हा रुग्णालय परंडा येथिल मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही.कुलकर्णी, डाॅ.अबरार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे जनऔषधी दिवस साजरा करण्यात आले.तसेच उपस्थित सर्व रुग्णांना मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या गोळ्या वाटप करून डॉ.पठाण सर यांनी शुगर,व उच्च रक्तदाब, कर्करोग तसेच नेत्रतपासणी, मौखिक आरोग्य, , भावनिक व मानसिक आरोग्य, पोषण आहार व मानसिक आरोग्य इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. यावेळी गुंजाळ तानाजी समुपदेशक यांनी सूत्रसंचालन केले.तसेच आरोग्य तपासणी डाॅ.अमिता वराडे ,अमोल वांबुरकर, रविंद्र करपे,अमर पठाण यांचा सहभाग होता. रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. या अभिनव उपक्रमामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.