
दै.चालु वार्ता
सिल्लोड: प्रतिनिधि
सुशिल वडोदे
सिल्लोड :भाडेतत्वावर दिल्यानंतर माणिकनगर (ता. सिल्लोड ) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे खडकपूर्णा एग्रो लिमिटेडच्या वतीने पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. यावर्षीपासून सिद्धेश्वर १५ वर्षाच्या करारावर खडकपूर्णा ऍग्रो लिमिटेडला चालविण्यात देण्याचा करार दोन्ही संचालक मंडळात झाल्यानंतर आज आयोजित पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे दोन्ही चेअरमन यांनी घोषित केले होते. मात्र, दोन्ही मंत्री महत्त्वाचे काम निघाल्यामुळे ते अनुपस्थित राहिल्याने आमदार दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिल्लोड तालुक्यातील सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.