दै चालु वार्ता वृत्तसेवा /
नवी दिल्ली :शुभम कुमार या परीक्षेत अव्वल आला आहे. यूपीएससीच्या निकालानुसार, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.नागरी सेवा परीक्षा २०२० मध्ये ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ५४५ पुरुष आणि २१६ महिला आहेत. आयएएस अधिकारी आणि २०१५ बॅचची टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया डाबी यांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिया डाबीने १५ वी रँक मिळवली आहे. यूपीएससीने नागरी सेवा २०२० चा अंतिम निकाल जाहीर केला आहे.
२६३ जनरल
८६ ईडब्ल्यूएस
२२९ ओबीसी
१२२ एससी
६१ एसटी
असं एकूण ७६१ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी १८० आयएएस, आयएफएस ३६, आयपीएस २००, अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा ३०२, ब गटातील प्रशासकीय सेवा ११८,