
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
श्री.रमेश राठोड आर्णी
सावळी सदोबा:-आर्णि तालुक्यातील राजकीय दृष्ट्या मागासलेला सर्कल म्हणून ओळख असलेला सावळी सदोबा सर्कल,या परिसरातून यावेळेस सावळी-ईचोरा जि.प गटातुन मा.राष्ट्रपती तथा राज्यपाल पुरस्कार प्राप्त शहीदपत्नी कुंन्तीताई आडे निवडणूकीच्या रिंगणात असणार आहे,
भारत मातेचे संरक्षण करताना दिनांक८/१०/२००२रोजी काश्मीर येथे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मौजा कृष्णनगर तांडा येथील विरपुत्र शहीद ज्ञानेश्वर आडे,सामाजिक वारसा असलेलं आडे कुटुंबीय,शहीदपत्नी श्रीमती कुंन्तीताई आडे,पतीला वीर मरण आल्यानंतर,कुटाबांची परस्थिती अत्यंत हलाखीची असताना,आपल्या कुटुंबावर एकप्रकारे दुःखाचा डोंगर कोसळला असताना,अशाही प्रस्थितिशी सामना करत कुटुंबातील आपल्या मुला-बाळाचं संगोपन करून,जबाबदारी सांभाळत खंबीरपणे उभं राहतं,आपल्या संसाराचा गाडा चालवत असताना,मौजा कृष्णानगर तांडा येथील ग्रामवासियांनी एकत्र येऊ कुंन्तीताई आडे यांच्यावर गावाची मोठी जबाबदारी दिली,सन २०१५ रोजी केळझरा (वरठी) गावच्या सरपंच या म्हणून अविरोध सरपंच पद बहाल केलंय,आपली कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आपल्या सरपंच पदाच्या कारकीर्दमध्ये, सामाजिक दायित्व समजून गावात अनेक नव-नवीन उपक्रम राबवून
या गावाला विकासाच्या मार्गावर नेण्यास मोलाची भूमिका बजावली,समाजसेवेसाठी अविरत झटणाऱ्या कुन्तीताई आडे यांनी लोकोपयोगी कामे करून लोकांची मने जिंकली,स्त्रियांच्या प्रश्नांची जाण असणारी महिला म्हणून त्यांची सावळी परिसरात खरी ओळख आहे, यावेळेस सावळी ईजोरा जि.प गटात निवडणुक लढणार असल्याचे त्यांनी दैनिक लोकमतशी बोलताना सांगितले,