
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे सन 2021-22 या वर्षासाठी दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुण गुणगौरव पुरस्कार कें.प्रा.शा.ब्रँच मुखेड येथील सहशिक्षक डॉ.शिवाजी कराळे यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन,कौशल्य विकास,महिला व बालविकास मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते देण्यात आला.
मुंबईतील रंग शारदा सभागृहात दि.24 फेब्रुवारी 2023 रोजी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी आ.कपिल पाटील,शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल,शिक्षण सचिव सूरज मांढरे,विद्या प्राधिकरणाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील,प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांना प्राप्त झालेल्या सन्मानाबद्दल जि.प.नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे,शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे,प्रशांत दिग्रसकर,प्राचार्य मनोहर तोटरे, गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे,मुख्याध्यापक जी.सी.चव्हाण,देवीदासराव बस्वदे,विस्तार अधिकारी विठ्ठलराव वडजे,दिलीपराव देवकांबळे , सर्व खाजगी प्राथमिक , माध्यमिक शाळा, सिनियर , ज्यूनियर कॉलेज , विविध विभागातील कर्मचारी मित्र मंडळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.