
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय, पूर्व प्राथमिक विद्यालय आणि इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका सरिता कापसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे यांनी मनोगत व्यक्त करताना जागतिक महिला दिन हा महिलांच्या कार्याची आठवण करून देणारा दिन आहे.या दिवशी महिलांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजमाध्यामात उमटविण्यासाठी संकल्प केला पाहिजे. सावित्रीबाई फुले, यांनी स्त्री शिक्षणाची दारे सर्व महिलांसाठी खुली केली. त्यामुळेच नारीशक्ती आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात निर्भिडपणे कार्य करीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात महिलांनी सर्वच क्षेत्रांत आपण ज्या क्षेत्रात कार्य करत आहे, त्या क्षेत्रात उल्लखनीय कार्य करण्याचा प्रयत्न करावा,असे आवाहन केले.या वेळी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सहशिक्षिका बसवते मॅडम यांनी ही महिला दिनाचे महत्त्व सांगून सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर आणि इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे यांनी विद्यालयातील महिला शिक्षिका आणि महिला कर्मचारी यांना पेन भेटवस्तू म्हणून दिला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ साठे यांनी केले तर आभार नानासाहेब घाडगे यांनी मानले.