
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
इंगळी, तालुका हातकणंगले ,जिल्हा कोल्हापूर. येथे रविवारी दि 5 मार्च 2023 रोजी कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी, आयोजित 13 वे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात लक्ष्मीनगर ,तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील कवी उत्तम बबन गळवे ,यांना राज्यस्तरीय काला श्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कवी : उत्तम बबन गळवे यांचा 50 पेक्षा जास्त स्पर्धेत सहभाग. यापूर्वी 2020 चा महाकवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार, 2022 चा संत रोहिदास पुरस्कार, 2022 चा उत्कृष्ट कलाकार पुरस्कार असे अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, पुरस्काराने विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे सामाजिक, राजकीय, साहित्यिक, क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.