
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो.राष्ट्रसंघाने यंदाची आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम “डिजिटल : लैंगिक समानतेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर ” असल्याची घोषणा केली आहे.स्त्री-पुरुष यांमध्ये असमानतेच्या मुद्द्यावरुन निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा या उद्देशाने ही थीम निवडण्यात आली आहे. सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे या महाविद्यालयात अशा विशेष दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात.महाविद्यालयात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयात महिलादिन जलोषात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व प्राध्यापक,विद्यार्थी,पालक यांच्या उपस्थितीत सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले.यावेळी विद्यार्थिनी कु.शीतल जाधव, कु.मनोरमा नाईकनवरे, कु.कोमल बुरुंगळे,कु.स्वामींनी डोके यांनी या दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.या मनोगतात त्यांनी महिलाचे यशस्वी जीवनातील महत्व विशद करताना महिला या कष्टाळू,प्रामाणिक,नम्र,शूर असतात अनेक रणरागिणी जसे कि माँ जिजाऊ,सावित्रीबाई फुले,इंदिरा गांधी,कल्पना चावला,आनंदी जोशी यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास गाजवला आहे.महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कौशल्याने उंच भरारी घेत आहेत व यशस्वी होत आहेत.महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीची दखल या दिनी घ्यावी असे मनोगत व्यक केले. या दिनानिमित्त महाविद्यालयात वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यास विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.तसेच महिला दिनानिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.एम.जी.शिंदे, कु.शिवानी भुसे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.एन.ए.तांबोळी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.पी.एम.आडत, प्रा.आर.एम.कोळी, विद्यार्थी यांचे योगदान लाभले..