
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
सांगोला ( प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला, इनरव्हील क्लब सांगोला व लायन्स क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये कवी सुनील जंवजाळ,कवी ज्ञानेश डोंगरे,कवी शिवाजी बंडगर, कवयित्री पुष्पलता मिसाळ,कवयित्री सुशिला नांगरे-पाटील, कवयित्री योजना मोहिते विविध विषयांवरील कविता सादर करणार आहेत.
हे कवी संमेलन शुक्रवार दि.१० मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वा. हॅप्पी हॉल (चौपाटी)वासुद रोड सांगोला येथे संपन्न होणार आहे. तरी या कविसंमेलनासाठी सांगोला शहरातील व परिसरातील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, सांगोला, इनरव्हील क्लब सांगोला व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे वतीने करण्यात आले आहे.