
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
सभापती बाळासाहेब काटकर आणि त्यांचा मुलगा विशाल काटकर यांच्यावर गुन्हा दाखल.
सांगोला- आर्थिक व्यवहारातून चिडलेल्या पिता-पुत्रांनी पैसे दिल्याशिवाय जीप जाऊ देणार नाही असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली व जीपची चावी काढून घेऊन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यास धक्काबुक्की केली. ही घटना मंगळवार ७ मार्च रोजी सकाळी १० च्या सुमारास वाकी- हलदहिवडी ता सांगोला रोडवर घडली. याबाबत, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर धनाजी मारुती घाडगे रा.चिंचोली यांनी पिता-पुत्राविरुद्ध फिर्याद दिली आहे.
चिंचोली येथील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर धनाजी मारुती घाडगे हे वाकी येथील बाळासाहेब निवृत्ती काटकर यांचेकडून सिमेंट खरेदी करीत असल्यामुळे दोघात आर्थिक व्यवहार होत होते दरम्यान मंगळवारी धनाजी घाडगे व त्यांचा भाऊ तानाजी घाडगे व त्यांचा ड्रायव्हर सूर्यकांत अंकुश कांबळे असे मिळून एम एच-१३ -११५९ या जीपमधून केटर्स ठरवण्यासाठी वाकी ता. सांगोला येथे गेले होते तेथून चिंचोली गावाकडे परत येताना वाटेत हलदहिवडी शिवारात सकाळी १० च्या सुमारास विश्वनाथ चव्हाण यांच्या घराजवळ आले असता विशाल काटकर हा त्यांच्या जीप समोर रस्त्यावर आडवा थांबल्याचे पाहून ड्रायव्हर सूर्यकांत कांबळे यांने जीप थांबवली त्यावेळी विशालने वडील बाळासो काटकर यांना बोलावून घेतले त्यांनी सदर ठिकाणी येताच जीपची चावी काढून घेतली व जीपच्या डाव्या बाजूला दरवाजा उघडून फिर्यादी धनाजी घाडगे यास धक्काबुक्की करून माझे पैसे दिल्याशिवाय तुझी जीप जाऊ देणार नाही असे म्हणून शिवीगाळ केली. घडल्या प्रकारानंतर भाऊ तानाजी घाडगे यांनी पोलीस स्टेशनला येऊन घडला प्रकार सांगितला दरम्यान च्या काळात पिता-पुत्रांनी मला व चालक सूर्यकांत कांबळे यास जीपमधून खाली उतरून दिले नाही असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.