
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
महिलादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उदघाटन सिने अभिनेत्री ईशा केसकर , जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या संयोगिता गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.
भूम – ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मा.नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या संकल्पनेतून व आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या वतीने नगर परिषद समोरील प्रांगणात बुधवारी सायंकाळी महिला दिन उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख आकर्षण म्हणून जय मल्हार फेम बानू,माझ्या नवऱ्याची बायको फेम सिणेतारका ईशा केसकर या होत्या.यावेळी संयोगिता गाढवे प्रास्ताविक करतेवेळी म्हणाल्या की, महिला दिन आम्ही फक्त निवडणुकीपुरता साजरा करत नाही . प्रतिवर्षी तो साजरा केला जातो .विकास कामात अडथळा आणणे हे काही जणांचे काम आहे . असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी केले . त्या जागतिक महिला दिनानिमित्त अलमप्रभू भूम शहर विकास आघाडी च्या वतीने आयोजित भव्य लकी ड्रॉ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमावेळी बोलत होत्या . पुढे त्या म्हणाल्या कि , माँ जिजाऊ , सावित्री माता , माता रमाई , अहिल्यादेवी , फातिमाबी , इंदिरा गांधी यांच्यासह अनेक कर्तृवान महिला आमच्या मनात आहेत . त्या फक्त बॅनरबाजीसाठी नाही तर त्यांची प्रेरणा आमच्या कामात आहे . आम्ही शहरातील महिला , युवती यांच्या सुरक्षिततेसाठी, चोऱ्या रोखण्यासाठी , अपघाती घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे . शिवशंकर नगर , इंदिरानगर या भागातील महिला , जेष्ठ नागरिक लहान मुले यांच्यासाठी सुंदर उद्यान तयार केले आहे . शहराचा विकास एवढ्यापुरताच मर्यादित नसून शहरातील नागरिकांच्या मनातला विकास केला जाणार आहे . यांना माता भगिनी साठी काही करणे होत नाही . आणि तुम्ही महिला दिनाच्या बॅनरवर आक्षेप घेता . या महिलादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उदघाटन सिने अभिनेत्री ईशा केसकर , जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या संयोगिता गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी संसारोपयोगी साहित्याचे विजेत्यांना वितरण सिने अभिनेत्री ईशा केसकर , जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या संयोगिता गाढवे , डॉ कांता सूळ , अश्विनी चव्हाण , निशिगंधा साळवे यांच्या हस्ते करण्यात आले . जिल्हा नियोजन समिती सदस्या, माजी उप नगराध्यक्षा संयोगीता गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे अक्षय आणि नितीन गुंजाळ यांनी केले.यावेळी महिलांचा मोठा प्रतिसाद होता . बक्षिस वितरणाचा कार्यक्रम नगर परिषदेच्या प्रांगणात सायंकाळी संपन्न झाला . या भाग्यवान विजेत्यामध्ये संगीता काळे (वॉशिंग मशीन) , आशा मस्कर (एल ई डी टीव्ही) , मेघा होनराव (फ्रिज) , नागर इटकर (सोफा) , आरती ढगे (मायक्रो ओव्हन ) ,तमन्ना पठाण ( कपाट ) , शिवांजली कांबळे (डायनिंग टेबल) , अंकिता शिंदे (कुलर) ,सीमा घोगरे (ड्रेसिंग टेबल) , मनिषा टकले (टी पॉय ) , शिल्पा सोनटक्के (गॅस शेगडी) यांचा समावेश आहे . या लकी ड्रॉ मधील बक्षिसे दैवशाला संजय साबळे , अमृता दत्ता गाढवे , समिना रईस ,नूतन बाळासाहेब सुर्वे , प्रज्ञा संजय देवडीकर , वैशाली सचिन कांबळे , शशिकला संजय चौधरी , स्वाती विलास पवार , सविता सिद्धेश्वर गायवाड , वर्षा कैलास पवार , अश्विनी अमोल भोसले यांच्या वतीने देण्यात आली आहेत . यावेळी श्रीमती सुरेख गाढवे , निरमला गाढवे , सुनिता गाढवे , शिवकन्या गाढवे , सुमन गाढवे , कोमल गाढवे , अपर्णा गाढवे , अमृता गाढवे , यांच्यासह शहरातील विविध प्रभागातील महिला मोठया संख्येने हजर होत्या .