
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:-.धाराशिव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचा ध्यास घेतलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी आता जिल्ह्याच्या औद्योगिक विकासावर लक्ष्य केंद्रित केलं असून भूम, परंडा वाशी,शिराढोण येथे “एमआयडीसी” – तर तेरखेडा येथे फटाका क्लस्टर उदयोगमंत्री उदय सामंतांची, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या उपस्थितीत “एक्स्प्रेस टॉवर “नरीमन पॉईट मुंबई येथे झालेल्या बैठकीत उपरोक्त घोषणा केली.धाराशिव जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलून राज्यात तो औद्योगिक दृष्ट्या प्रगत करण्याच्या उद्देशाने पालक – मंत्री मा.ना. तानाजीराव सावंत सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामधिल हा स्तुत्य प्रयत्न असून हजारो तरुणांना नोकरी मिळणार आहे यातून होणारी तरुणांची भटकंती थांबणार असून एक नव संजीवनी येणार आहे.धाराशिव जिल्हयाची ओळख राज्यात मागासलेला, शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत जिल्हयात होत होती ती पुसून टाकण्याचा हा प्रयत्न- जिल्ह्यात एमआयडीसी च्या माध्यामातून उद्योग खेचून आणत जिल्ह्यातील भूमिपुत्रांना नोकऱ्या, रोजगार व त्याच मधून आर्थिक विकास- साधण्यासाठी दूरदृष्टीने हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला गेला. आर्थिक विकासापाठोपाठ विविध पुरक व्यवसाय व पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचे यामागे धोरण आहे.
जिल्ह्याची दुरावस्था चालू असताना प्रा. डॉ. तानाजी रावांच्या रूपाने “विकासपुरुष” विकासा-त्मक कामासाठी लाभला ही चर्चा जनसामान्यातून होत असून नुकताच तेरणा साखर कारखाना या स्वरूपात चर्चा होत असते.तेरखेड्याची ओळख राज्यातच नव्हे तर देशामध्ये “फटाका उत्पादनाच्या बाबतीत “आहे . ही ओळख, स्थानिकांचे कौशल्य व सदर ठिकाणचा पारंपारिक व्यवसाय याचा विकास होण्यासाठीच “फटाका क्लस्टची निर्मिती करण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार व फटाका बाजारपेठेत तेरखेड्याचे अढळ स्थान निर्माण होईल हे निश्चितः धाराशिव जिल्ह्याचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक विकासास पोषक पुरक व पुढे घेऊन जाणारे हे पाऊल निश्चितच गौरवास्पद आहे. अशी चर्चा भावना जनसामान्यातून होत आहे. यामुळे भूमिपुत्रांना रोजगार नोकरी मिळणार असून धाराशिव जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण असून या बैठकीमध्ये मंत्री महोदय यांचे अधिकारी, तसेच कर्तव्यदक्ष महिला उपविभागीय अधिकारी भूम रोहिणी नऱ्हे, तहसीलदार उषा किरण शृंगारे या होत्या.