दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: तालुक्यातील गावालगत जामगाव येथे २१५ वे ध्यानसाधना धम्मशिबिर प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर ४ मार्च ते ८ मार्च पर्यत आयोजित केले होते उद्धिटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून हेमराजजी खोब्रागडे शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आयु. पि. पी. मोहड होते तर प्रमुख पाहुणे ठाणेदार लक्ष्मण लोकरे(आष्टी) ठाणेदार आशीष गजभिये (तळेगाव) उपस्थित होते.
पाचदिवसिय धम्म शिबिरामध्ये सहआचार्य गुलाबराव नेवारे , राजूजी थूल, मधुकरराव सवाळे , प्रकाशराव दंडाळे धम्मसेवक कुणाल दंडाळे यांनी ४९ कर्मस्थाने, त्रिपिठक, नामरुप षडायतन ईश्वर आणि आत्मा, धम्माचे १० दागिने, महामंगल सुत्त,पाच प्रकारचे मित्र , पाच प्रकारचे शत्रू , बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रथाचा इतिहास या व इतर विषयावर सखोल मार्गदर्शन केले
आयोजनाकरीता सिद्धार्थ नेवारे यश हरले,सागर धारस्कर,निखिल सिंयाले,प्रज्वल धारस्कर, धनराज कातडे,मधुकरराव बासंदे, कुणाल धारस्कर, वामन धारस्कर, आरती नेवारे पायल नागले यांनी अथक परीश्रम घेतले