दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
स्थानिक क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ आणि राजीव गांधी उद्यान योग नृत्य परिवार पठाणपुरा च्या संयुक्त विद्यमाने आज दि. 10//3/2023 प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा व नतमस्तक होऊन जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक नंदू नागरकर , गजानन गावंडे गुरुजी ,माळी समाजाचे अध्यक्ष राजू बनकर ,घनश्याम वासेकर माजी नगरसेवक प्रशांत दानव, प्रकाश चहारे, प्रकाश फुटाणे, बंडू देवोजवार, खुशबू चौधरी, एकनाथ जिजिलवार,
डॉ.काळमेघ आदींसह योग नृत्य परिवारतील सर्व सदस्यांची बहुसंख्येने उपस्थित होती.