दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
दि.८मार्च २०२३ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, चंद्रपूर महिला काॅंग्रेस विठ्ठल मंदिर प्रभागाच्या वतीने विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त महिलांना सन्मानित करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यात भारतजोडो यात्री प्रेरणा सुभाषसिंह गौर, महिला पतंजली योग समिती महामंत्री सौ.अपर्णा प्र.चिडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ.अनिता नरेंद्र बोबडे, महिला पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी नसरीन शेख, समाजसेविका श्रीमती शालिनी भगत आदी महिला सत्कारमुर्तींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन माजी नगराध्यक्षा सौ.सुनिताताई लोढिया व ग्रामीण महिला कांग्रेस जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमसकर यांनी सन्मानित केले. याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थित महिलांना जिल्हा ग्रामीण महिला कांग्रेस अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर व चंद्रपूरच्या माजी नगराध्यक्षा व काॅंग्रेसच्या जेष्ठ नेत्या सौ.सुनिता लोढिया यांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
काॅंग्रेस चे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील सहभागी झालेल्या यात्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रदेश प्रतिनिधी सुभाषसिंह गौर यांच्या सुपुत्री प्रेरणाताई यांनी १४० दिवस पदयात्रेत चालत चालत सुमारे ४०८० कि.मी.चे अंतर पार करून जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मध्ये पोहोचतांना यात्रेच्या माध्यमातून विविध राज्यांतील विविध घटकांना अत्यंत जवळुन बघीतल्याने व समरस झाल्याने स्वतःला आलेल्या अनुभवांचे कथन प्रेरणाताईंनी आपल्या भाषणातून सत्काराला उत्तर देताना केले. याप्रसंगी शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक नंदु नागरकर,माजी नगरसेविका खुशबू चौधरी , कार्यक्रमाच्या आयोजिका शोभाताई वाघमारे आदी मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.