दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पंचक्रोशीतील भाविकांचे ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबा) यांचा संदल सोमवार 13 मार्च रोजी रात्री 9 वाजता वाजत गाजत मजारवर चढवण्यात येणार आहे. तर मंगळवार14 मार्च रोजी मुख्य उरूस भरणार आहे. या वेळी खाद्यपदार्थ, विविध वस्तूंचे स्टॉल उभारले जातात, त्यामूळे खरेदी करण्यासाठीही गर्दी होत असते.
देवाच्या मानाच्या घोड्यांची मिरवणूक (छबीना) सायंकाळी सात वाजता फटाक्यांच्या आतषबाजी करत तसेच लेझीम, हलगीच्या निनादात काढण्यात येणार आहे. रात्री 9 वाजता पायल सावंत सोबत विशाल सावंत गोतोंडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार 15 मार्च रोजी दुपारी 4 वाजता कुस्त्यांचा जंगी मुकाबला होणार आहे. त्यानंतर सायंकाळी प्रार्थना करून उरुसाची सांगता करण्यात येणार आहे.
————————————–