दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनीधी-सौरभ कामडी
मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदिप वाघ यांनी तालुक्यातील विविध प्रलंबित कामांच्या विषयी पंचायत समिती समोरच उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या पहिल्याच दिवशी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देवून मागण्या संदर्भातील लेखी पत्र दिले होते मात्र अशी नुसती आश्वासने नको मागण्या केलेल्या कामांचे तात्काळ काम सुरू करावे तसे पुरावे मला द्यावेत तेंव्हाच उपोषण सुटेल अन्यथा नाही अशी भूमिका वाघ यांनी घेतल्याने नेहमी आश्वासनावर बोळवण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळीच सर्व संबंधित अधिकारी आपल्याशी संबंधित विषयांच्या सोडवणूकीसाठी प्रत्यक्ष जागेवर जावून काम सुरू केल्याने वाघ यांनी हे उपोषण मागे घेतले पहिल्यांदाच असे यशस्वी उपोषण झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सायदे धरणाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू व्हावे,जलजीवन अंतर्गत काम करताना पाणीपुरवठा योजनांची केलेली नादुरुस्ती तात्काळ दुरुस्त करावी,चास गोमघर येथे पाणीपुरवठा सुरू व्हावा कुर्लोद येथे उपकेंद्र बांधावे खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा तसेच जातीचे व ईतर दाखले विद्यार्थ्यांना शाळेत द्यावेत खोडाळा येथे आधारकार्ड केंद्र चालु करावे या विषयांवर हे उपोषण चालु केले होते उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी तात्काळ सायदे धरणाचे काम सुरू झाले,गोमघर व चास पाणीपुरवठा योजनांची रखडलेली कामे काम सुरू झाली,कारेगाव पाणी पुरवठा सुरू झाली तात्काळ दाखले वाटप करण्यासाठी सोमवार पासुन अधार शिबिर खोडाळा येथे लावण्यात येणार आहे. कुर्लोद आरोग्य केंद्रासाठी लवकरच नवीन मान्यता दिली जाईल खोडाळा ग्रामिण रुग्णालय प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला सुर्यमाळ आरोग्य केंद्राला तात्काळ वैद्यकीय अधिकारी दिले असून कायम स्वरुपी पद भरण्याचे लेखी सांगितले आहे यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी तहसीलदार मयुर खेंगले, गटविकास अधिकारी कुलदीप जाधव, पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे यांनी यशस्वी भूमिका निभावत सर्व विभागांशी संवाद साधला याच बरोबर सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते तसेच तालुक्यातील सर्व सरपंच सदस्य उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.