
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- प्रथम अपिलीय सुनावणीमध्ये अर्जदारास नैसर्गिक न्याय मिळावा.सुनावणीस हजर राहण्यासाठी खुप कमी वेळ दिला असून व उपस्थित न राहिल्यास प्रकरण निकाली काढण्यात येईल असे सांगितले असून हा प्रकार माहिती अधिकार कायद्याचा भंग करणारा आहे.अर्जदाराचे उपस्थित असणे सक्तीचे नसून अर्जदार स्वईच्छेने उपस्थित राहणार असल्यास त्यांना सुनावणी दिनांकाच्या दहा दिवस अगोदर नोटीस पाठवणे गरजेचे असताना आपल्या कार्यालयाने सुनावणीसाठी अर्जदाराचा नियमापेक्षा जास्त वेळ घेऊन अर्जदारास अतिशय कमी वेळ दिला आहे.हे न्यायीक नसून अर्जदारास पुन्हा एकदा सुनावणी ठेवून अर्जदारास नैसर्गिक न्याय मिळवून द्यावा अशी मागणी गजानन तुकाराम जाधव रा. पेठवडज ता.कंधार जि.नांदेड यांनी मा.प्रथम अपिल अधिकारी , पंचायत समिती कंधार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रतिलीपी प्रत देऊन कळविण्यात आले आहे.