दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी –
नांदेड/लोहा:-दगडसांगवी ता.लोहा येथील रहिवासी असलेली सद्या छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थाईक असलेली कांचन फाजगे हिची महाराष्ट्र महिला क्रिकेट असोसिएशन च्या सदस्य पदी निवड झाली आहे कांचन फाजगे हिचे आजुळ जानापुरी ता.लोहा हे आहे तिला लहानपणा पासुनच क्रिकेट चे वेडे होते संभाजीनगर मध्ये कॉलेज मध्ये असताना संभाजीनगर महीला क्रिकेट मध्ये भरपुर नाव कमवले आहे आणी आता तिची महाराष्ट्र महीला क्रिकेट असोसिएशन च्या सदस्य पदी निवड झाली हि कौतुकास्पद बाब आहे तिच्या पुढील कार्यासाठी तिचे मामा कृ.उ.बाजार समितीचे उपसभापती बळीराम पाटील जानापुरीकर,माधवराव पाटील जानापुरीकर, कैलास पाटील ,त्र्यंबक पाटील, उमेश पाटील, बापुराव पाटील, गणेश पाटील यांनी शुभेच्छा चा वर्षाव केला