
दै. चालू वार्ता प्रतिनिधी नांदेड बाजीराव गायकवाड
मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ यांच्याशी दि. 22/11/2021 रोजी मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात येऊन रास्तभाव दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यावर अभ्यास गटाची निर्मिती करुन रास्त भाव दुकानदारांच्या न्याय मागण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मा. अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदरील बैठकीस ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर फेडरेशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दि. 1 डिसेंबर 2021 पासून अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांनी रास्त भाव दुकानदारांचा राज्यव्यापी बंद घोषित केला असून सदरील निर्णयाला फेडरेशनने विरोध दर्शविला आहे. जगामध्ये कोरोना साथ असताना नागरिक आर्थिकदृष्ट्या नागवला गेला आहे. गरीब नागरिकांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी हे रेशन दुकानावरच अवलंबून आहेत. केंद्र सरकारने बुधवारी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत पुढील चार महिने मार्च 2022 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने करीता मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानदारांकडून शिधापत्रिका धारकांनी गैरसोय होऊ नये, व त्यांना कोरोना महामारीत वेळेवर धान्य उपलब्ध व्हावे यासाठी दि. 1 डिसेंबर 2021 पासून होणाऱ्या बंदमध्ये सहभगी होता कामा नये, असे निवेदन मा. अन्न व नागरी पुरवठा मंत्री, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांनी आपली दुकाने माहे डिसेंबर 2021 मध्ये चालू ठेऊन शिधापत्रिकाधारकांना नियमित व मोफत धान्याचे वाटप करण्याचे आवाहन ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर फेडरेशनचे बाबुराव म्हमाणे, जनरल सेक्रेटरी, शहाजी लोखंडे, विभागीय अध्यक्ष, पुणे, शाहुराज गायकवाड, सहसचिव, नांदेड जिल्हाध्यक्ष अशोक जयंतराव एडके, कार्याध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल मुनीर, उपाध्यक्ष अशोक गायकवाड, कोषाध्यक्ष बळवंत सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस अनिल कुलकर्णी, मो. जुनेद, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर उकरंडे, शहराध्यक्ष ताहेर खान, शहर उपाध्यक्ष मो, जमिल, शहर कोषाध्यक्ष मो. मुजाहीद, मो. फारुख अब्दुल नदिम अब्दुल सलीम, देविदास दगडे, सुनील पटकोटवार, मो. शारेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.