
दैनिक चालु वार्ता सांगोला ( प्रतिनिधी)
शासनाच्या सन २०२२-२३ मधील विविरण पत्रामध्ये २२ डिसेंबर २०२२ रोजी मंजुर झालेल्या अ.क्र. २ मधील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहा समोरील बाजुस व्यापारी संकुल बांधणे हे काम २.३० लक्ष एवढे रकमेचे असुन तो खर्च व्यापारी संकुल न बांधता तो निधी व रक्कम अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक सुशोभिकरण खर्च करणेकामी
सांगोला न.पा. जिल्हा सोलापूर करिता रक्कम रुपये ५.८० लक्ष एकता निधी दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी सांगोला नगरपरिषदेसाठी मंजूर झालेला आहे.
तो निधी एकूण तीन कामासाठी मंजुर झाला असून तो निधी सध्या मा. जिल्हाधिकारी व त्यांचे कार्यालयकडे उपलब्ध झालेला आहे. तरी त्या एकूण तीन कामामधील अ.क्र. २ चे विकास, काम हे राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहासमोरील बाजूस व्यापारी संकुल बांधणे हे काम आहे. हे काम एकूण निधी पैकी हे काम २.३० लक्ष एवढया रकमेचे आहे.
परंतु तो निधी त्याठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यास खर्च केल्या व त्याठिकाणी व्यापारी संकुल उभे राहिल्यास सद्यस्थितीला त्याठिकाणी असलेला पुण्यश्लोक राजामाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा झाकला जाणार आहे.
व स्मारक देखील झाकले जाणार आहे. असे झाल्यास सांगोला वासीय इतिहास पुसण्याचे साक्षीदार होणार आहेत. तरी हे व्यापारी संकुल त्या ठिकाणी उभे राहिले तर भविष्यात सध्यठिकाणी असलेल्या स्मारकामध्ये अनेक प्रकारचे गैरकृत्य घडणार आहेत.
तरी त्यामुळे तमाम अहिल्यादेवी प्रेमीच्या वतीने विनंती करतो को राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहासमोर व बाजूस व्यापारी संकुल बांधकाम करु नये व त्याठिकाणी अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या प्रांगणामध्ये
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णकृती पुतळयाच्या चबुत-यासाठी व स्मारकासाठी जागा व निधी मंजुर करावा या मागणीसाठी दि.१३ मार्च २०२३ वार सोमवार दिवशी तमाम अहिल्याप्रेमीच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणीक उपोषण /आंदोलन केले आहे
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख ,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, आंदोलनकर्ते तुषार इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, नगरसेवक प्रताप मस्के, रासपचे नेते आबा मोटे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, युवक नेते प्रमोद भाई ठोंबरे ,धनगर समाज मंडळाचे माजी अध्यक्ष नवनाथ शिंगाडे, राहुल मस्के ,धनगर समाज मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर ,युवा उद्योजक किरण पांढरे, शेखर गडहिरे, सरपंच लक्ष्मण मारकर, बाबुराव मेटकरी , नंदकुमार मेटकरी,विष्णू देशमुख, सतीश मोटे चंद्रकांत चौगुले शिवसेनेचे नेते रघुनाथ आईवळे, शिवसेना नेते गोरख येजगर यासह धनगर समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.