
दैनिक चालू वार्ता जळकोट प्रतिनिधी-हानमंत गित्ते
जळकोट तालुका येथील उमरदरा गावांमध्ये पाणी प्रश्न मागिल कित्येक वर्षापासून भेडसावत आहे.
उन्हाळा सुरू होण्याअगोदरच तलावातील पाणी संपलेले आहे. त्या तलावातील पाणी अगोदरच पिण्यायोग्य नाही. गावातील जनता त्या पाण्याचा जनावरासाठी व सांडपाण्यासाठी वापरतात. दरवर्षी उमरदरा गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अग्रेसर होता परंतु या वर्षी तर सांडपाणी व जनावरासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही त्यामुळे सर्वगाव मोठ्या चिंतेमध्ये आहे. हि बाब लक्षात घेऊन जळकोट तालुक्यातील मनसेने निवेदन देऊन प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशा प्रकारचे निवेदन मा.श्री. बीडिओ साहेब व तहसीलदार मॅडम साहेब व लातूर जिल्हा दंडाधिकारी कलेक्टर पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आले त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष महेश देशमुख व रो. स्वयंरोजगार सेना तालुका अध्यक्ष लक्ष्मण लांडगे व शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष गजानन पदम पल्ली तसेच उमरदरा शाखा उपाध्यक्ष सचिन गुट्टे उमरदरा शाखा उमरदरा शाखा सहसचिव मंगेश गुट्टे उमरदरा शाखा कोषाध्यक्ष नरसिंग पांचाळ व अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.