दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई –अंबाजोगाई बस आगारासमोर आगाराचे प्रमुख कारागीर यांत्रिक मधुकर माने हे ज्येष्ठता यादीनुसार बढती मिळणे तसेच अन्यायकारक दिलेल्या शिक्षा रद्द करणे व इतर मागण्यासाठी दिनांक 13मार्च2023 रोजी पासून आमरण उपोषणास बसले आहेत. अंबाजोगाई आगाराचा सावळा गोंधळ पहायला मिळत असून मधुकर माने यांच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार बाहेर निघण्याची शक्यता आहे.
प्रशासनाच्या नियमानुसार लेखी आदेशावरून प्रमुख कारागिर ( यांत्रिक ) रिक्त पदावर 10 वर्ष मधुकर माने यांनी काम केलेले आहे. परंतु अद्याप पर्यंत मधुकर माने यांना आर्थिक लाभ देण्यात आलेला नाही. विशेषता प्रमुख कारागीर पद रिक्त नसताना मधुकर माने यांच्यापेक्षा कनिष्ठ श्री.केंद्रे एस बी यांना बढती देवुन वेतन देण्यात आले .या प्रकरणी भ्रष्टाचार झाला आहे.तसेच अंबाजोगाई आगारात 10 कर्मचाऱ्यापेक्षा कनिष्ठ श्री. आर.यू. रेवडकर यांना प्रमुख कारागीर म्हणून काम करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्याची मागणी उपोषणकर्ते मधुकर माने(माजी सैनिक) यांनी केली आहे.
सैनिक निवृत्तीधारकांची वेतन निश्चिती करणे बाबत शासनाचे लेखी आदेश आसुनही अद्यापपर्यंत वेतन निश्चित केलेली नाही .ती देण्यात यावी .मधुकर माने हे गेले दहा वर्ष रा.प. महामंडळात पद कारागीर ” क ” यांत्रिक म्हणून दिनांक-01/03/2005 पासुन काम करत आहेत. त्यांची पद प्रमुख कारागीर यांत्रिक म्हणून दिनांक -30/04/2023 रोजी सेवा निवृत्ती ही या महिन्यात आली तरीही अद्याप पर्यंत त्यांचे वेतन निश्चित केलेले नाही.
मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी मुंबई यांना मधुकर माने यांनी 21 ऑक्टोबर 2021 रोजी तक्रार अर्ज केला. या तक्रार अर्जाची दखल घेत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश 28 ऑक्टोबर 2021 रोजी दिले आहेत.परंतु दुर्दैवाने मा .विभाग नियंत्रक , रा.प.विभाग , बीड यांनी श्री . न . म . चौरे साहेब आगार प्रमुख अंबाजोगाई यांच्याकडे चौकशीचे काम दिलेले आहे. ज्याच्यावर तक्रारदाराने आरोप केलेले आहेत त्यांच्याकडे चौकशीचे काम दिलेले आहे. हे नैसर्गिक न्याय तत्वास धरून नाही.
आगार प्रमुख श्री. कुरेशी,श्री. कराड,श्री.चौरे यांनी माझ्या केलेल्या आर्थिक नुकसानाची संभाजीनगर, नागपूर किंवा इतर समितीमार्फत तात्काळ चौकशी करून त्यांच्या पगारातून दंड वसूल करून मला भरपाई देण्यात यावी.
अंबाजोगाई आगारातुन दिनांक 11 जून 2016 रोजी नियमबाह्य कोठेही नोंद न करता अनाधिकृत ठिकाणी 20 लिटर डिझेल पाठवण्यात आलेले आहे .सदर दिवशी मी प्रमुख कारागीर म्हणून हजर होतो. तेव्हा आगार प्रमुख श्री कुरेशी साहेब हे पण हजर होते एसीबीने भ्रष्टाचार प्रकरणी लातूर व अंबाजोगाई येथे कारवाई केलेली आहे. जवळपास दोन वर्ष ते निलंबित होते. चौकशी समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीनवर कारवाई करण्याची मागणी आमरण उपोषण कर्ते श्री.मधुकर माने(माजी सैनिक)यांनी केली आहे.त्यामुळे
अंबाजोगाई बस आगाराचा भ्रष्टाचार बाहेर निघण्याची शक्यता